✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोल:–सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ घर घर संविधान मेळावा ‘ या उपक्रमा निमित्य संविधानाचे ७५ वर्ष निमित्य प्रशिद्ध गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा कार्यक्रम दिनांक २१ मार्च रोजी सांयकाळी ६ ते १० च्या वाजतादरम्यान संविधान चौक कन्नमवार नगर गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
आंबेडकरी चळवळीतील कालवंत डॉ. अनिरुध्द वनकर यांच्या नेतृत्वाखाली १५ कालावंताचा सांस्कृतिक जालसा होणार शिवराय ते भिमराय बुद्ध भिम गिताचा जलसा या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या मोहत्सवात अभिनेत्री डॉ. कोमल धांडे लातुर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे खासदार डॉ. नामदेव किरसान गडचिरोलीच्या नगराध्यक्षा अँड प्रणिती निंबोरकर कौशल्य विभागाचे संचालक साहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंन्डे गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. अनिल हिरेखन माजी जि.प सदस्य अँड राम मेश्राम रोहिदास राऊत किशोर वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन लोकजागृती नाट्यसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.








