
नगरपंचायतीने केलेल्या बांधकामाची सखोल चौकशी करावी अशी गावकऱ्यांची मागणी.सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत येथील सन 2020 ते 2025 दरम्यान आलेल्या बांधकामाच्या निधी प्रमाणे कामाचे स्वरूप उत्कृष्ट दर्जाचे नसून ते फक्त पैसे हडपणाच्या पोटी नगरपंचायतीने कामे हे कमीत कमी दर्जाची व लोकल पद्धतीने केली आहे अशी नगरपंचायत सिरोंचा गावकऱ्यांच्या आरोप आहे. मा. मुख्याधिकारी साहेब यांना राजन्ना तोटा, फाजील पाशा,शंकर अण्णा मु. सेनिगपूर या गावकऱ्यांनी निवेदन दिले. नगरपंचायतीने केलेलं कामे ही निकृष्ट दर्जाची असून केवड 20- 25 दिवसामध्ये कामाचे स्वरूप दिसत आहे.तसेच प्रभाग क्र.17 मध्ये कोणतेही नवीन काम न करता जुन्या कामावर लिपापोती करून शासनाची दिशाभूल केली आहे. तसेच राजकीय दबाव टाकून बिल काढण्याचा षडयंत्र सुरू असल्याची शक्यता आहे.आणि गावकऱ्यांची अशी मागणी आहे की निष्पक्ष खालील कामाची सखोल चौकशी करण्यात यावी . व जो पर्यंत सर्व कामाची सखोल चौकशी होत नाही तो पर्यंत संबंधित ठेकेदारांना कोणत्याही प्रकारच्या कामाची देयक रक्कम देऊ नये. तसेच या प्रकरणात कुणी दोषी आढळून आल्यास ठेकेदार अथवा जबाबदार वेक्ती वर कडक कारवाई करण्यात यावी. केलेले बांधकाम यादी 1. प्रभाग क्र. 2 राधास्वामी मेडिकल ते ब्रह्मानंद कोतावडाला यांच्या घरापर्यंत वेरिक कोट बांधकाम.2. प्रभाग क्र.3 तूंगा मदनया ते सत्यम पारपेलि सी. सी. रोड 3. प्रभाग क्र.5. राजू गागपुरपु ते नवीन जन्नमवार यांच्या घरापर्यंत वेरिक कोट बांधकाम.4. प्रभाग क्र.14 सत्यनारायण सूपटम ते राजेखान यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम 5. प्रभाग क्र. 17 नगरसेवक जगदीश रालाबड्डी यांच्या भागात राजे गंटावार पर्यंत नाली बांधकाम.






