यवतमाळ:- शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात शनिवार ता.२५ एप्रिला दुपारी १२ वाजता सीतानवमीच्या पावन पर्वावर श्रीमती गिताबाई उत्तमराव झोटींग सिंगलदीप जि. यवतमाळ, श्रीमतीविमल बंडु शेळके रेवगाव जि. जालना, श्रीमती मंगला मोहन घडे वर्धा, श्रीमती,ज्योती यशवंत खांडेकर नागपुर, श्रीमती संध्या शिरीष पान्सी पाढरकवडा जि. यवतमाळ, श्रीमती शशिकला रवींद्र डोहे येरगव्हान जि. चद्रपुर, श्रीमती स्वाती अनिल धामंदे वर्धा, श्रीमती सुनिता विजय कातखेडे धामनगाव जि. अमरावती, श्रीमती अल्का गणेश शिंदे नेक नांनपूर जि. अमरावती, या नऊ महिलाना २०२६चा स्वयंसिध्दा सीता सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे सीतानवमी पावन पर्वावर स्वयंसिध्दा सीता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व हनुमान देवस्थान ट्रस्ट, रावेरी तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. या सोहळ्यात ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्तिशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करुन लव-कुशा प्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर व समाजातील प्रतिष्ठीत आणि सन्माननीय नागरीक म्हणून घडवले आहे. अशा कर्तुत्ववान धैर्यशील महाराष्ट्रातील नऊ मातांचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. वामन चटप, उद्घाटक माजी आमदार सरोज काशीकर,विशेष उपस्थिती सविताताई कौशिक कार्यकारी संचालक एबीपी माझा टि व्ही चॅनल, मुबंई, शे. म. आघाडी अध्यक्ष प्रज्ञा बापट, स्व. भा. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, शेतकरी संघटना तंत्रज्ञान विज्ञान विस्तार आघाडी प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले, शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे, स्व. भा. पार्टीचे माजी प्रांताध्यक्ष ॲड. दिनेश शर्मा, प्रदेशाध्यक्ष स्व. भा. पा. महिला आघाडी प्रदेशाध्याक्ष सिमा नरोडे, शैलाताई देशपांडे माजी प्रांताध्यक्ष माजी प्रांताध्यक्ष शे. स. महिला आघाडी, गीताताई खांदेभराड, माजी प्रांताध्यक्ष शे. म. आघाडी, गुणवंत पाटील हंगरगेकर माजी अध्यक्ष शे. स., दिपक चटप प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना,विजय निवल प्रदेशाध्यक्ष व्यापार आघाडी, राजाभाऊ पुसदेकर बळीराज्य विदर्भ प्रमुख, सतीश दाणी माजी युवा आघाडी अध्यक्ष,बाळासाहेब देशमुख अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी,राजेंद्र तेलंगे सरपंच,वर्षाताई तेलंगे संचलिका जि म स बॅक, उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमत्रंक शेतकरी संघटना महिला आघाडी,सीता नवमी उत्सव समिती, असुन या कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आव्हान शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष तसेच गणेश मुटे,सारंग दरणे, अक्षय महाजन, गोपाल भोयर, भास्कर पाटील,गिरीश तुरके,प्रकाश काकडे, रावेरीचे उपसरपंच गजानन झोटींग, संदीप तेलंगे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, महिला आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे यांनी केले आहे.