✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
नागपूर:-आज दिनांक 22 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर शहरच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे उपवर्गीकरणाबाबत राज्यशासनाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाला अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करायचे आहे का ? असा सवाल रिपाई आंदोलन कर्त्यांनी केला कारण राज्य शासनाने सेवानिवृत्त न्यायाधीश बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता उपवर्गीकरणाबाबत अल्पावधीत आक्षेप नोंदविण्याची केलेली सक्ती व मुख्यसचिवांच्या समितीकडून एक महिन्यात प्राप्त केलेला अहवाल, यावरून शासनाला अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कारावयाचे आहे असे स्पष्ट होते.
परंतु अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करताना 2027 च्या जनगणनेचा एम्पिरिकल डाटा उपयोगात आणला पाहिजे संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 21 व 46 या कलमाची सुसंगत कारवाई करावी अति मागासलेल्या वर्गास लाभ देण्यासाठी उपवर्गीकरण हा एकमेव मार्ग नाही
अनुसूचित जातीमध्ये अति मागास राहिलेल्या लोकांची जबाबदारी ही शासनाची जबाबदारी आहे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्ट्या विविध योजनांचा उपयोग करून त्यांना सक्षम करावे.
या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत मा. रमेश जीवने यांनी
अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करताना शासनाने अनुसूचित जातीतील महार व धर्मांतरित बौद्ध यांची एकत्रित संख्या लक्षात घ्यावी व अनुसूचित जातीचा 13 टक्के आरक्षणाचा कोटा आधी पूर्ण करावा त्यानंतर उपाययोजना करावी. 17 सप्टेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना मसुदा समितीत अनुसूचित जातीच्या सूचीला राज्य व न्यायालय तसेच राष्ट्रपतीला छेडछाड करण्याचा अधिकार नाही तर तो अधिकार केवळ संसदेला आहे असे स्पष्ट केले त्यामुळे असंवैधानिक पद्धतीने आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे आरक्षण धोरण संपुष्टात आणणे ठरेल असा आरोप या प्रसंगी मा. रमेश जीवने यांनी केला.प्रा. रमेश पिसे, जनार्दन मून,प्रकाश कुंभे ,आकाश खोब्रागडे, राजन वाघमारे,दिनेश घोडघाटे, बाबासाहेब घरडे इत्यादींनी आपले विचार मांडले यावेळी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळी शिष्टमंडळात प्रकाश कुंभे, रमेश जिवने, क्षितिज गायकवाड, विजय महेशगवळी, ईश्वर मेश्राम, मनोज वासनिक, ज्ञानदीप गायकवाड, सुरेश खोब्रागडे होते धरणे आंदोलनाचे भूमिका क्षितिज गायकवाड यांनी विशद केली सूत्रसंचाल रजत महेशगवळी यांनी तर शुभम वनकर आभारप्रदर्शन केले आंदोलनात पंचम गायकवाड ,रामदास गजभिये, मुकुंद मेंढे,प्रा.प्रदीप बोरकर, राजू गजभिये, संजय रामटेके, आनंद खोब्रागडे, मनोज गणवीर, सुनील शेंडे, निलेश कापसे, राजेश ढेंगरे, संजय नगरारे, प्रेम गजभिये, मोरेश्वर घाडगे, बापू खोब्रागडे, भोजराज सरोदे शेखर सोनारकर,रवींद्र पाटील ,सुदर्शन मुन,चंद्रमणी गजभिये, प्रेमदास चहादे, धनराज भगत,डॉ.चरणजीत जनबंधू,जयकिसन गजभिये,आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्तित होते














