गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील तुमनूर टोला येथे समग्र शिक्षा अंतर्गत गुणवत्ता विकास कार्यक्रम पहिली केंद्र स्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख व्हि . एम. सुननकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. एस ए झोडे एस एम चुक्कावार वनमामुला सर आदि लाभले होते. याप्रंसगी डॉ. एस. ए झोडे म्हणाले की शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे तर शिक्षक हा राष्ट्र घडविणारा शिल्पकार म्हणजेच राष्टनिर्माता आहे. शिक्षण क्षेत्रात काम करतांना विध्यार्थांच्या सर्वांगीक विकास कसा होइल याकडे शिक्षकांनी लक्ष घ्यावे.

सदर परिषदेत ९ विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यात शाळा पुर्व तयारी व विद्याप्रवेश या विषयावर डॉ. झोडे सर यांनी मार्गदर्शन केले. जीडीवार सर यांनी तर निपुन महाराष्ट्र तर सेतु अभ्यासक्रम व निपुण महाराष्टू तर गणित विज्ञान कार्यक्रमात देवघडे सर PAT विश्लेषण यावर सद्दि सर मारगोनी यांनी PARAKH नियोजन तोडे सरांनी विधांजली पोर्टल तर सुननकारी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कु. भंडारी PGI विश्लेषण चुक्कावार सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवघडे सर तर आभार शिंदे सर यांनी मानले मुख्याध्यापक जीडीवार च्या वतीने भोजन देण्यात आले.













