✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा गडचिरोली च्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम अनिस गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर चंद्रशेखर भंडागे , तुळसिराम सहारे दशरथ साखरे प्रा. आनंद दहेगावकर लता रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यांप्रसंगी अनिसचे चंद्रशेखर भडांगे म्हणाले की ‘ डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य आयुष्यभर केले त्यांनी अंधश्रद्धा नष्ट करण्याकरीता शेवटच्या श्वासापर्यत प्रयत्न केले त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक आहेत. यांप्रसंगी तुळलिदास सहारे यांनी डॉ. दाभोलकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला तर प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य विज्ञानवादावर आधारित असले पाहिजे तरच अंधश्रद्धा दुर होइल.

कार्यक्रमास किशोर मेश्राम नामदेव दुधे नेताजी मेश्राम मिलिंद अंबादे माधव वैद्य लवकुंश भैसारे प्रेमदास रामटेके मोरेश्वर निमगडे जिवन मेश्राम रोशन उके दामोधर शेंन्डे खेमदेव हस्ते हेमंत बारसागडे केतन हेडावू संघमित्रा राजवाडे लता भैसारे प्रेमलता कान्हेकर मंगला ब्राम्हणवाडे लिला वाकडे देवलाबाई शेन्डे बासुदा शेख आदि सहीत बहुसंख्य अनिस कार्यकर्ते उपस्थित होते.
















