✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचिरोली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी असून डॉ. आंबेडकरांनी सांगीतलेल्या तिन संघटनापैकी आरपिआय एकमेव पार्टी असून ती गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावत पोहचविण्याचा माझा प्रयत्न राहील अश्या प्रकारचे मार्गदर्शन आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातुन आलेल्या रिपब्लिकन पार्टी च्या असंख्य कार्येकर्ता समोर केले.

☸️रिपब्लिकन पार्टीचा जिल्हास्तरीय मेळावा शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी यमुना हॉल गडचिरोली येथे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी जि.प. सदस्य अँड राम मेश्राम यांचे हस्ते उद्घाटन पार पडले विशेष अतिथी म्हणून गायक डॉ. अनिरुद्ध वणकर तर मुख्य अतिथी म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोपाल रायपुरे महिला आघाडी प्रमुख अँड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ता प्रज्ञा निमगडे आरमोरी माहिती अधिकार अध्यक्ष तुळसिराम जांभुळकर ॲड. विनय बांबोळे साहित्यिक डॉ. चंद्रशेखर बांबोळे प्रदेश उपाध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे प्राचार्य हेमंत रामटेके बामसेफचे भोजराज कान्हेकर प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन भद्रावती तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे डॉ. चंद्रसुरेख डोंगरवार राज्य सचिव अशोक उमरे कोरपना कोमल रामटेके चंद्रपूर इंजि. विजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ता सुशिला भगत आलापल्ली घोट सर्कलचे अध्यक्ष विशाल दहिवले समता सैनिक दलाचे प्रमुख अभिमन्यु बन्सोड पत्रकार दिनेश झाडे विदर्भ पुकार मुख्य संपादक. दिनेश वनकर मनमन मंडल मुलचेरा दिक्षाभुमी वडसाच्या अध्यक्षा ममता जांभुळकर अँड. शांताराम उंदिरवाडे जंयत शेंन्डे किशोर उंदिरवाडे सावली राजकुमार रामटेके शिंदेवाही निशांत भसारकर प्रमोद राऊत उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे मिलिंद अंबादे ढेंभुर्णे सावकार महिला प्रमुख संघमित्रा उंदिरवाडे पिक्की शेंन्डे वडसा विशाखा देवतळे विलासिनी राऊत आदि मंचकावर बसले होते.
याप्रसंगी बहुसंख्य वक्त्याची भाषणे झालीत व प्रा. मुनिश्वर बोरकर यांना त्यांच्या वाढदिवशा निमित्य त्यांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात.
यांपसंगी विशेष अतिथी गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी रिपब्लिकन पार्टी हि रा.सु गवईच्या काळात जबरजस्त होती आजही रिपाई सर्वत्र आहे कारण रिपाई हि भाजपा – शिवसेना सोबत नसून कांग्रेसचा मित्र पक्ष म्हणून आहे. अध्यक्ष पदावरून प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांनी रिपब्लिकन पार्टीचा खरा शत्रू रिपब्लिकन पार्टीच्या गटातटातील छोटे – मोठे नेतेच आहेत. रिपब्लिकन पार्टी ला वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
सदर कार्यकर्ता मेळाव्यास गडचिरोली प्रमुख ज्ञानेश्वर मुजुमकर जिवन मेश्राम रोशन उके मोरेश्वर उंदिरवाडे लता रामटेके लता भैसारे चामोर्शी प्रमुख बंडू कुळवे ॲड. डि. एन राऊत अँड. एम. डी सहारे शालु खोब्रागडे वर्षा सहारे आरमोरी तालुका प्रमुख अशोक शामकुळे ॲड. शुकदेवे वडसा प्रमुख साजन मेश्राम प्रभा मेश्राम कुरखेडा प्रमुख सुनिल सहारे तारांचद नंदेश्वर लता सहारे धानोरा प्रमुख ढवळे ,जर्नाधन बांबोळे रामटेके दुकानदार सिरोंचा तालुका प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु अंकुल कलकोटा समता सैनिक दलाचे मुत्ताजी दुर्गे देवाजी भैसारे निशा सिंपोडकर यशोधरा मेश्राम रेखा गणविर वालदे मॅडम कोंढाळा आदि सहित चिमुर लोकसभा क्षेत्रातील रिपाई व समता सैनिक दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन गायक विजय शेंन्डे तर आभार निशांत भासारकर यांनी मानले.














