राजुरा येथे काँग्रेस कार्यालयात सद्भावना दिवस साजरा ; राष्ट्रीय एकता, अखंडता व शांततेची प्रतिज्ञा
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-आधुनिक भारताच्या विकासाचा भक्कम पाया रचणारे, देशात तंत्रज्ञान, दूरसंचार व संगणक क्रांतीला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय राजुरा जवळील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात सद्भावना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी सद्भावना दिवस साजरा करताना देशाची राष्ट्रीय एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासोबतच शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याची तसेच हिंसाचाराला नकार देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. स्व. राजीवजी गांधी यांनी देशाच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारताला एकविसाव्या शतकाच्या दिशेने नेण्याचे दूरदृष्टीपूर्ण कार्य केले. युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासोबतच संगणक व दूरसंचार क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यांनी घेतलेले निर्णय भारताच्या आधुनिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरले, असे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी नमूद केले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाष्कर वाटेकर, जंगू पाटील येडमे, नगरसेवक ईश्वर ठाकरे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष धनराज चिंचोलकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निरंजन मंडल, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, वामन वाटेकर, कवडू सातपुते यांच्यासह काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.













