चंद्रपुर:-चंद्रपूर येथे आज बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी ‘दीक्षाभूमी मुक्ति आंदोलन जनआक्रोश मोर्चा व जाहीर सभा’ अत्यंत उत्साहात आणि लाखो लोकांच्या अफाट जनसागरात पार पडली. सर्व बौद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मोर्चाने संपूर्ण चंद्रपूर शहर दणाणून सोडले.
मोर्चाची ठळक वैशिष्ट्ये:
भव्य जनसमुदाय: या जनआक्रोश मोर्चानिमित्त चंद्रपुरात लाखोच्या संख्येने बौद्ध-आंबेडकरी बांधव, माता-भगिनी आणि तरुण वर्ग रस्तावर उतरला होता.
विशाल जाहीर सभा: मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध वक्तांनी उपनस्थितांना मार्गदर्शन केले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित येऊन सहभाग नोंदवला.
शिस्तबद्धता आणि नारा: संपूर्ण आंदोलनादरम्यान अत्यंत शिस्त पाळण्यात आली असून, न्याय हक्कासाठी उपस्थितांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या ऐतिहासिक आंदोलनामुळे चंद्रपूरमधील वातावरण पूर्णपणे बौद्ध-आंबेडकरीमय झाले होते असून, प्रशासनाकडूनही या अनुषंगाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



👉प्रमुख मागण्या
(1) चंद्रपूर दिक्षाभूमीचा गेल्या 32 वर्षात निधी येऊन सुद्धा विकास झाला नाही. विकास झाला पाहिजे हि बौद्ध बांधवाची मागणी.
(2) सदर दिक्षाभूमी हि घोटेकर परिवारातच आहे याचा बदल झाला पाहिजे.
(3) समाजातील बेरोजगार सुशिक्षित डॉक्टर वकील यांना दिक्षाभूमी कार्यकारणीत समाविष्ठ करावे
(3) ऑडिट करून जनतेला हि सोब घ्यावा
(४ ) दिक्षाभूमी चंद्रपूर च्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रम राजकिय व्यक्तीचा भरणा नसावा
(५) कार्यक्रमाच्या दिवशी दिक्षाभूमी लगत भिंतीला लागून स्टॉल लावणे बंद करावे
( ६) तयार केलेली तात्पुरती कार्यकारणीत घोटेकर चे हितसंबंधीतं आहेत बौद्ध बांधवाना हि कार्यकारणी मान्य नाही
( ७) मा. जिल्हाधिकारी ‘ प्रशासक समोर समिती गठीत करावी
( ८ ) मोर्चाकरुच्या मागण्या बरोबर नसतील तर मोर्चाच्या समोर येऊन जनतेला सांगावे.

















