कोरपना येथे बहुजन समाज पार्टीचे (BSP) कार्यकर्ते श्री. बंडू कुळमेथे व सौ. शशिकला कुळमेथे या दाम्पत्याचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश.
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-दि. २,
भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांचे आणि कार्यकर्त्यांचे एक कुटुंब आहे. या पक्षाची खरी ताकद ही तळागाळात अहोरात्र राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. तळागाळातील हाच निष्ठावंत आणि परिश्रम घेणारा कार्यकर्ता हीच भाजपची खरी ऊर्जा आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना येथे काल (दि.१) बहुजन समाज पार्टीचे (BSP) कार्यकर्ते श्री. बंडू कुळमेथे व सौ. शशिकला कुळमेथे या दाम्पत्याने आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.

आमदार देवराव भोंगळे बोलतांना पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. पक्षाची सर्वसमावेशक धोरणे आणि गतिमान विकासकामांमुळेच आज सर्वसामान्य नागरिक मोठ्या विश्वासाने भाजपकडे येत आहेत, असेही आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी अनु.जमातीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, भाजपाचे कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, विशाल गज्जलवार, नगरसेवक किशोर बावणे, सत्यवान घोटेकर, उमेश पालीवाल, अबरार अली, सुनील बावणे, मोहब्बत खान यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













