अमोल बेरड
प्रतिनिधी, भोयगाव
भरोसा :-2 नोव्हेंबर २०२६ ला देशसेवेचा गौरव करणारा भावपूर्ण सत्कार सोहळा भरोसा येते आयोजित करण्यात आला. भारतीय सैन्यदलात तब्बल 17 वर्षे प्रदीर्घ सेवा पूर्ण करून गावी परतलेले भारोसा येतील सुपुत्र माननीय श्री. सचिन संबा निखाडे यांचा समस्त भारोसावासी जनतेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह भारोसा येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

(नाईक) सचिन संबा निखाडे यांनी याच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारोसा येथे शिक्षण घेतल्यानंतर देशसेवेची वाट निवडली आणि भारतीय सैन्यात दाखल होऊन देशाच्या सीमेवर 17 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय देशसेवेबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि कृतज्ञता व्यक्त करत (नाईक) सचिन संबा निखाडे यांनी आपल्या शाळेतील ,देशसेवेतील आठवनी तथा विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी भविष्यात देशाच्या सेवेसाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली.
गावातील विद्यार्थ्यांनीही त्यांच्या देशसेवेचा आदर्श घेत देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा घ्यावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारा ठरला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती ,श्रीगुरूदेव सेवा मंडळ सदस्य ,जय हनुमान पदावली भजन मंडळ ,महिला भजन मंडळ सदस्य , विद्यार्थी, पालक, युवक तसेच भारोसा येथील प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













