चिमूर आगार व्यवस्थापकांना बस सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी…
चिमुर:-चिमूर तालुक्यातील चिमूर-बामणी-अडेगाव आणि वाघेडा या ग्रामीण मार्गावर एसटी महामंडळाची बस सेवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने प्रवाशांना,विशेषतः शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी रस्त्याची दुरवस्था आणि खराब रस्त्याचे कारण पुढे करत चिमूर बसस्थानक व्यवस्थापकांनी ही बस सेवा बंद केली होती.मात्र,आता रस्त्याची स्थिती सुधारली असली तरी अद्याप या मार्गावर बस सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये चिमूर आगार व्यवस्थापकाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे
➡️ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान….

वाघेडा आणि अडेगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी चिमूर येथे ये-जा करतात.बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्जन करण्यासाठी पायी किंवा खाजगी वाहनांद्वारे महागडा प्रवास करावा लागत आहे.यामुळे वेळेवर वाहन न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सदर मार्गावर बस धावत नसल्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासाठी मुला मुलींना ४ किलोमीटर विहिरगाव बस स्टॉप ला जाणे,आणि ४ किलोमीटर येणे असा अळचणीचा पायदळ प्रवास करावा लागतो आहे.या प्रवासामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास शालेय विद्यार्थ्यांना होत आहे.बस नसल्याचा गैरफायदा घेऊन अवैध खाजगी वाहनधारक प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करत आहेत.गरीब नागरिक,महिला आणि वृद्ध रुग्णांना यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
➡️ आंदोलनाचा इशारा…
स्थानिक ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी चिमूर आगार व्यवस्थापकाला (एसटी डेपो) यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत.बस आगार व्यवस्थापकांनी तातडीने या मार्गाची पाहणी करून चिमूर ते वाघेडा बस फेरी पूर्ववत सुरू करावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा वाघेडा-अडेगाव परिसरातील नागरिकांनी दिला आहे.













