कोरपना तालुक्यातील कुकुडबोडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश.
✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-दि.३,
भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर, निष्ठेवर आणि विश्वासावर उभा राहिलेला पक्ष आहे. पक्षाची खरी ताकद ही गावखेड्यात राबणाऱ्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांच्या याच बळावर भाजप आज लोकहितासाठी विकासाची नवी शिखरे गाठत आहे, असा विश्वास राजुरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.

कोरपना तालुक्यातील कुकुडबोडी येथील काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी (दि.१) भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.


देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्यात विकासकामांना गती देण्यात येत आहे. नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर ठोस निर्णय घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हीच भाजपा सरकारची प्राथमिकता असल्याचे, आमदार भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये पुरुषोत्तम सोयाम, विलास आत्राम, महादेव मेश्राम, सचिन कंडे, गणेश आत्राम, अजय कापटे, वासुदेव पेंदोर, संतोष कंडे, निखिल कंडे, अनिकेत कंडे, प्रफुल धुर्वे, बबन मेश्राम, चरणदास कंडे, विशाल वाघाडे, विनोद कुळसंगे, प्रदीप जुमनाके, लक्ष्मण पेंदोर, पुरुषोत्तम आत्राम, प्रदीप तुराणकर, समीर कंडे, संभा कोडापे, रामदास गेडाम, वामन मेश्राम, मनीराम पेंदोर, शालिक पेंदोर, प्रमोद कुळसंगे, जगदीश बोरडे, धोंडुजी उईके, रामकिसन मेश्राम, गौरव कुळसंगे, मंगलाबाई बोरडे, ताणेबाई गेडाम, शांताबाई मेश्राम, चंद्रकलाबाई उईके, बेबीबाई कुळसंगे, ललिताबाई कंडे, पंचफुला आत्राम, निर्मलाबाई कापटे, रेखा गेडाम, रंजिता मेश्राम यांचा समावेश आहे.
आमदार देवराव भोंगळे यांचा विकासात्मक दृष्टिकोन, तळागाळातील जनतेशी असणारी जवळीक आणि त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याची भावना यावेळी नवप्रवेशीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.या पक्षप्रवेश प्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, अनु. जमातीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, नगरसेवक सत्यवान घोटेकर, भाजयुमोचे तालुका महामंत्री दिनेश ढेंगळे, हिमांशू नामवाड, संतोष बोरडे, अविनाश वाभीटकर, सचिन कंडे, पुरुषोत्तम सोयाम, बाबाराव राऊत, मोहब्बत खान, सुनील बावणे, शंकर पिंगे यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












