✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
मुंबई:-भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे हे उपवर्गीकरणाच्या नावाखाली केवळ आपली राजकीय पद आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मातंग समाजाच्या भावनांशी खेळत असून समाजाला वेठीस धरत आहेत, असा थेट आणि घणाघाती आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमदार अमित गोरखे यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. पत्रकात म्हटले आहे की, मातंग समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून ‘लोकस्वराज्य आंदोलनाचे’ प्रणेते प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र ‘वज्रमूठ आंदोलन’ सुरू आहे. मातंग समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. मात्र, स्वतःला समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्या आमदार अमित गोरखे यांना महिनाभरात या आंदोलकांना साधी भेट देण्याचीही सूसूत्रता आणि वेळ मिळालेली नाही. आमदार गोरखे यांना जर मातंग समाजाबद्दल खरोखरच आस्था आणि सहानुभूती असती, तर त्यांनी आंदोलकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. परंतु, त्यांची उदासीनता समाजाची दिशाभूल करणारी आहे.
मंत्रालयासमोर आंदोलन, गुन्हे दाखल झाले तरी गोरखे गायब!
या आंदोलनाची तीव्रता एवढी होती की, गेल्या १९ मे रोजी लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते मंत्रालयासमोर झोपून निषेध नोंदवत होते. तर आंदोलक अड. दत्तराज गायकवाड हे मुंबईच्या आझाद मैदानातील झाडावर चढून प्राणांतिक आंदोलन करत होते. या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले त्यांना त्रास सहन करावा लागला एव्हडी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही आमदार अमित गोरखें आंदोलकांना भेटीसाठी फिरकले नाहीत
केवळ स्वतःच्या प्रतिष्टेसाठी समाजाचा वापर?
जर समाजाचे कार्यकर्ते उपावर्गिकरनसाठी गुन्हे अंगावर घेत असतील रस्त्यावर उतरून रक्त सांडीत आहेत तर आमदार गोरखें कुठे लपून बसले आहेत? असा संतप्त सवाल भाई इंगळे यांनी केला केवळ एसी केबिन मध्ये बसून उपवर्गिकरणाच्या नावाखाली स्वतःचे राजकीय पुनर्वसन करणे आणि स्वतःची पद प्रतिष्ठा वाढविणे एव्हडाच एककलमी कार्यक्रम अमित गोरखें चालवत आहेत काय, अशी शंका आता सामान्य मातंग समाजाच्या मनात निर्माण झाली आहे
आमदार अमित गोरखें यांनी मातंग समाजाला वेठीस धरणे त्वरित थांबवावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी समाजाच्या हितापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा मोठी मानणाऱ्या अश्या लोकप्रतिनिधींना समाज कधीही माफ करणार नाही असा इशाराही बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला असून लोकस्वरज्य आंदोलनाची दखल घेवून मुक्ताई ब्रिगेड च्या संस्थापक अध्यक्षीका ज्योतीताई क्षीरसागर यांनी मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा सुमन नगर चेंबूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापर्यात पायदळ लाँग दिनांक ६जून रोजी आयोजित केला आहे त्यासाठी मुंबई महानगरात राज्यातील मातंग समाजाच्या लोकांनी सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे
भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना
7796191596














