संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
ब्रह्मपुरी:-देशाला स्वातंत्र्य मिळाले नसताना सुद्धा २६ डिसेंबर १९२५ रोजी उत्तर प्रदेशात कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून शेतकरी , शेतमजूर दलित, शोषित,वंचित, आदिवासी, महिला, विद्यार्थी युवक व इतर घटकातील सर्वांसाठी, कामगारांसाठी पक्षाचा अविरत संघर्ष सूरू असून
त्याग, बलिदान संघर्ष व जनतेची सेवा करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिवसाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने शताब्दी महोत्सव ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे शनिवार दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला.

या शताब्दी महा एल्गार मेळावा महोत्सवाचे उद्घाटन काँ, राजन क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा नवी दिल्ली. यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काँ, प्रा, नामदेव कन्नाके राज्य सचिव अखिल भारतीय आदिवासी महासभा चंद्रपूर यांनी भुसवले, प्रमुख वक्ते म्हणून काँ, बबली रावत राष्ट्रीय सचिव आयटक मुंबई, काँ, श्याम काळे राज्य सहसचिवक नागपूर, काँ.डॉ. महेश कोपुलवार राज्य सचिव मंडळ सदस्य भाकपा आरमोरी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मपुरी नगर परिषदेची माजी उपाध्यक्ष अशोक रामटेके, मिलिंद भनारे जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना, शिवसेनेचे भूषण रामटेके. राष्ट्रवादीचे नेते विनोद नवघडे, भाकप चे जिल्हा सचिव कॉ.रवींद्र उमाटे, कॉ देवराव चवळे, अँड जगदीश मेश्राम, आवळगावचे सरपंच प्रीतम बाबनवाडे, आयटक चे अध्यक्ष कॉ एन.टी.म्हस्के, कॉ.दिलीप बर्गि, प्रदीप चिताडे, राजु गईनवार, प्रकाश रेड्डी,महिला नेत्या कॉ.ज्योती अंडरशहारे, वनिता कुणटावार, निकिता नीर, कुंदा कोहपरे, किरण धोंगडे, महेंद्र सोंडवले,श्रीधर वाढइ, विनोद राऊत, केशव बानबले, दादा आष्टेकर याच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँ, विनोद झोडगे यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्याबद्दल युवक युवती पुरुष महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकशाही काँ, धम्मा खडसे रा.अमरावती यांचा क्रांतिकारी शायरी जलश्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.








