✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली प्रदर्शन करून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती , प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले . या रॅलीत भारत मुक्ती मोर्चा , राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (ओबीसी) मोर्चा , आरपीआय , बहुजन क्रांती मोर्चा , राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व विविध संघटनानी सहभाग घेऊन निदर्शने करून घोषणाबाजी केली .यासह एससी, एसटी , ओबीसी व अल्पसंख्यांक यांच्या समर्थनातील युजीसी बिल लागू करावे तसेच २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टिईटी पासून मुक्त करावे यासाठी रॅली काढून धरणे प्रदर्शन करण्यात आले .

⏯️ हा आंदोलनाचा तिसरा टप्पा असून मागण्या पूर्ण न झाल्यास २३ एप्रिलला भारत बंद करण्यात येईल असा संघटनेच्या वतीने ईशारा देण्यात आला .
निवेदन देते वेळी बामसेफचे जिलाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिलाध्यक्ष प्रमोद राऊत , बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम, प्रेमदास रामटेके , नरेंद्र शेंडे, आरपीआयचे चोखोबा ढवळे ,दशरथ साखरे , राहुल घोनमोडे, श्रावण मेश्राम , यशवंत वंजारे, लवकुश भैसारे, जैराम उंदिरवाडे, मोरेश्वर निमगडे , दामोधर शेंडे , रोशन उके, जीवन मेश्राम , योगेश वानखेडे , प्रकाश सहारे, सुरेश मेश्राम, योगेश मडावी , सुनंदा बांबोळकर , सुप्रिया मेश्राम , प्रेमलता कान्हेकर , लता रामटेके , प्रेमिला नान्होरीकर , अनन्या उंदिरवाडे , आर्यन उंदिरवाडे, अमिता भैसारे, माया मेश्राम , वृक्षाली उंदिरवाडे , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.








