गडचांदुर:-कोरपणा तालुक्यातील पहिले सिमेंट प्रकल्प म्हणून उदयासआलेले दि सेंचुरी टेक्सटाईल मुंबई यांचे माणिकगड सिमेंट आता नव्याने अल्ट्राटेक सिमेंट म्हणून प्रसिद्ध असलेले गडचांदूर स्थित या सिमेंट प्रकल्पाच्या अनेक विवादग्रस्त घटनेमुळे नेहमी चर्चेत राहते येथील व्यवस्थापन मुजोरी मनमानी व जनतेच्या प्रश्नाला दुर्लक्ष करणारे म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या तीन महिन्यापासून गडचांदूर स्थित प्रदूषण वायू प्रदूषण धूळ प्रदूषण यामुळे संपूर्ण गडचांदूर शहर त्रस्त असून अनेक वेळा गावामध्ये येणाऱ्या दुर्गंधी विषारी वायूमुळे अनेकांच्या प्रकृती बिघाड होऊन नागरिकांनी तीव्र असंतोषातून कंपनी विरोधात प्रदर्शनी केली या कंपनीचे कुसुंबी स्थीतचुनखडी खाणीसाठी 1981 मध्ये शासन नी .करार करून 643. 62 हेक्टर जमीन लीज करारावर भाडे पट्टे आधारे वन विभाग महसूल विभाग व खाजगी जमीन देण्यात आली होती कंपनीने मंजूर पेक्षाही आपला पसारा विस्तार करत शासनाचा महसूल बुडवीत गेल्या 40 वर्षात कोटावधी रुपयाचे महसुलाला चुना लावत कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उचलला मात्र झालेल्या करारामध्ये नोकारी आसापूर जिवतीकडे दहा-बारा गावाची जोडणारा पेसा आदिवासी क्षेत्रातील हा रस्ता 1947 स्वतंत्र पूर्व काळापासून निजाम काळात वाहीवाटीचा व पांदन निस्तार हक्कपत्र असलेला हा रस्ता करारामध्ये मुद्दा क्रमांक ५ मध्ये नमूद असून तो सार्वजनिक असल्याचा आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे असे असताना माणिकगड सिमेंट कंपनीने शंकर मूर्ती जवळ हा खाजगी रस्ता नाही म्हणून बोर्ड लावले मात्र हा सार्वजनिक रस्ता कंपनीने गिळंकृत केले असून कोणती परवानगी नसताना अनेक ठिकाणी बांधकाम केले त्याबाबत नगररचना विभाग किंवा

ग्रामपंचायतची कोणतीही अनुमती घेतलेली नाही असे असताना या गेट बाबत यापूर्वी नागरीक कंपनी व्यवस्थापन मध्ये वाद झाल्याने तत्कालीन तहसीलदार राजुरा यांनी दिनांक 7.7. 2020 लाआदेश पारित करून हा रस्ता सार्वजनिक वाईवाटीचा असल्यामुळे रस्त्यावरील अन्नाधिकृत बांधकामे काढून घ्यावे व या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी अडथळा ठेवण्यात येऊ नये असे आदेश पारित केले मात्र कंपनीने काही दिवस आदेशाचे पालन करीत गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना किंवा नागरिकांना सहजतेने गेट खुले करून दिला जात होते मात्र आता कंपनीने थेट गेटवर कुलूप लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना विचारपूस व अनेक प्रश्न विचारून मनाई करतात यामुळे लोकांमध्ये तीव्र भावना उमटले असून दहा ते बारा गावातील येणार जाणार नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे गेट नंबर एक व तीन वर ताले ठोकल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करण्याची पाळी आली आहे एवढेच नव्हे तर कंपनीच्या समर्पित केलेली 150 हेक्टर वन जमीन व्यतिरिक्त असलेली 413 नंतर व कर्मचारी निवासस्थानासाठी खरेदी केलेल्या 42 हेक्टर जमीन व्यतिरिक्त लिंगेणडोह परिसरातील जमिनीवर मातीची बाहुली तयार करून थेट सिमेंट काँक्रेट कोड व लोखंडी तारांचे कुंपण घालित असून ही जागा कंपनीची नसताना कंपनी त्या ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने तारेचे कुंपण करीत आहे यामागे कोणाचे हात आहे याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात असताना नागरिकांनी 30 मे पर्यंत संपूर्ण गेट खुले करण्यात यावे कंपनीने पर्यायी संरक्षण भिंत व आपली सुविधा उपलब्ध करून घ्यावी तसेच अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील अनाधिकृत अतिक्रमण सिमेंट खांबे काढून घ्यावे अशी मागणी जोर पकडली असून या परिसरातील कंपनीच्या मुजुरीला व ताळे ठोकल्यामुळे याबाबतची कोणतीही रितसर परवानगी नसताना सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्य गेट उभारून वाहतूक केला अडथळा निर्माण केला आहे त्याचे कंपनीने आपले जळवाहाने येण्या जाण्यासाठी म्हणून अधिवाशांच्या बॉम्बे जरी येथील जमिनीवर रस्ता तयार करून आपल्या मनमानीचा परिचय दिला आहे यामुळे ही कंपनी आदेश आदिवाशांच्या जीवावर उठली असून कंपनीच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष आहे त्याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कंपनीच्या मनमानीला आवर घालावा व रस्त्यावरील जमिनीवरील अतिक्रमण तातडीने काढावे अशी मागणी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे शिष्टमंडळ भेटून सादर करण्यात येणार असल्याची माहिती जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी दिली यावेळी अरुण उदे सुनिल पेंदोर जंगु आत्राम भाऊराव कन्नाके केशव कुडमेथे उपस्थित होते















