संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
आरमोरी:- बौद्ध धम्माशिवाय जगाला सुख शांती मिळणार नाही जगाचा उद्धार बुद्ध धम्मानेच होईल कारण आज युध्द नको बुद्ध हवे तरच जगात शांती नांदु शकतो अस्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन पुज्य भन्ते प्रज्ञानंद महाथेरो यांनी अंतरजी येथील बौध्द धम्म परिषद प्रसंगी केले.


आरमोरी तालुक्यातील अंतरजी ( जोगीसाखरा ) येथील शाक्यमुनी फॉरेस्ट मॅनेस्ट्री अंतरजी येथे भव्य धम्म परिषद दि. १५ मार्च ला पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटक भन्ते प्रज्ञानंद महाथेरो यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमास भिक्खु सचक महाथेरो भन्ते नंद भदन्त शाक्यजोती बुद्धगया भन्ते कश्यप्प औरंगाबाद भन्ते विनालाचंत ब्रम्हपुरी कुणालकिर्ती सांवगी भन्ते महामोगलायन सांवगी भन्ते सोन पहाडी भन्ते सुमेरा सांवगी भन्ते महान्ताम सावंगी भिक्खुनी सुमेधा सांवगी आदि ४०भिक्खू सहीत डॉ. राजकुमार शेंन्डे प्रा. मुनिश्वर बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भन्ते प्रज्ञानंद पूढे म्हणाले की भारतामधे नष्ट झालेला बौद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुर्न जिवित केला म्हणुनच भारतामधे मोठ्या प्रमाणात विहाराची निर्मीती होत आहे आणि म्हणुन धम्म वाढविणे गरजेचे आहे. याप्रंसगी डॉ. राजकुमार शेंन्डे धम्मबंधु मुनिश्वर बोरकर यांचे धमाप्रती समायोचित भाषणे झालीत. दिवाकर रामटेके आरमोरी यांनी अडीच एकर जमीन दान केली त्यामुळे त्यांचा भन्तेजींचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भन्ते सारी पुत यांनी तर संचलन गुणवंत डोर्लीकर तर आभार भिमराव मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास समता सैनिक दलाचे मुत्ताजी दुर्गे पुरुषोतम भैसारे देवाजी भैसारे प्रा. सहारे प्रज्ञा निमगडे शालीनी शुकदेवे राजेंद्र गेडाम मनोज दामले लता रामटेके ताराचंद बन्सोड रोशन रामटेके संघमित्रा राजवाडे डॉ. उज्चला शेंन्डे लता रामटेके लता भैसारे लता सहारे विलाशिनी राऊत आदि सहीत बहुसंख्य उपाषक उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते.








