संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
बल्लारपुर:-बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती करायचे असेल तर आपल्या एकजुटीची गरज आहे त्यासाठी १२ फरवरी २०२६ ला चलो दिल्ली आवाहन करीत आहे आपण सर्वांनी रामालिला मैदान दिल्ली येथे ऐक्याचे दर्शन घडवायचे आहे अश्या प्रकारचे आवाहन पुज्य भन्ते विनाचार्य बुद्धगया यांनी पाली बुद्ध विहार बल्लारपूर येथील जन जागृती अभियान कार्यक्रमात केले.
बौध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पुज्य भन्ते विनाचार्य , भिक्खुसंघ , नितीन गजभिये , रत्नदिप रंगारी नागपुर , प्रा. डॉ. संजय दुधे , डॉ. गोपाल रायपूरे, प्रा. मुनिश्वर बोरकर , भाष्कर भगत , गायत्री रामटेके , शालीनी वावरे , आदी मान्यवर उपस्थित होते.⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

💢मार्गदर्शन करतांना भन्ते विनाचार्य म्हणाले की , महाबोधी विहार काबिज करणाऱ्या बाम्हण – पंडितांना बाहेर काढणे कठीण नाही परंतु बौद्ध बांधवानी स्वतः ची बुद्धिमत्ता न चालविल्याने आजही महाबोधी महाविहार बाम्हण पंडीताच्या हातात आहे. ब्राम्हण पंडित खुपकाही विद्यवान नाहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हण पंडितांच्या हुशारीला चॉलेन्ज करून बौद्ध धम्म स्विकारला मग आम्ही ब्राम्हण पंडिताचे आव्हान स्विकारून महाबोधी महाविहार मुक्त का करू शकत नाही तेव्हा १२ फरवरी चे आंदोलन त्यासाठीच आहे. सर्वांनी याव असे भन्ते विनाचार्य ने आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जयदिप भगत समायोचित मागर्दशन ॲड. प्रियका चव्हाण , नितिन गजभिये यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करीता मुख्य आयोजक अजय चव्हाण , अशोक भावे , जयदास भगत , शितल करमेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमास बल्लारपूर व परिसरातील बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.








