संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
धानोरा :–मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च 26 पर्यंत राबवण्यात येत असून नुकताच धानोरा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत येरकड येथे श्री शांतिरक्षक वानखेडे गट विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांच्या नेतृत्वात, व बबलू आत्राम विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या उपस्थितीत श्री कुणाल भोई जळगाव व यांचे चमू ने ग्रामपंचायत येरकड अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील ,शाळा,अंगणवाडी इत्यादी ठिकाणाचे संपूर्ण चित्रीकरण केले. याप्रसंगी श्री नंदनवार पशुधन विकास अधिकारी ,अजमेरा विस्तार अधिकारी शिक्षण, जायभाये शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा,मोरेश्वर अंबादे केंद्रप्रमुख,श्री वासुदेव उसेंडी सरपंच उपस्थित होते.
या कमिटीचे लेझीम व गाण्याच्या तालासुरात स्वागत करण्यात आले, गावात सर्वत्र फेरी मारून गाव स्वच्छ असल्याने त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरकड येथे अभियानांतर्गत झालेल्या कामाचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम परसबाग वृक्ष लागवड याचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच श्री जगदीश बद्रे देसाईगंज यांचा जादूटोणा विरोधी कायदा अमलबजावणी बाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला अंगणवाडी क्रमांक 1,2 व3 यांना भेट देऊन तिथे तयार करण्यात आलेल्या आहार प्रदर्शनी ची पाहणी करण्यात आली, सोबतच अंगणवाडी अंतर्गत परसबागेचे चित्रीकरण करण्यात आले.महिला बचत गटाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन उमेद व माविम अंतर्गत महिला बचत गटाचे उल्लेखनीय उपक्रम व केलेल्या कार्याचे चित्रीकरण करून बचत गटाच्या महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या, गावातील धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन उपक्रम कॅमेरा मध्ये टिपण्यात आले. गावामध्ये सार्वजनिक जागेवर 200 ट्रिप ट्रॅक्टर माती श्रमदानातून भरणा करण्यात आली, व सदर जागा सार्वजनिक स्वरूपात वापरण्याकरिता योग्य करण्यात आली. त्या जागेला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले व भविष्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. त्याचे सुद्धा चित्रीकरण करून ग्रामस्थांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सोबतच वनराई बंधारा ,वृक्ष लागवड व गावातील सौंदर्यीकरण कॅमेरा मध्ये टिपण्यात आले या संदर्भातील संपूर्ण माहिती श्री वासुदेव उसेंडी सरपंच व श्री जयंत मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुलाखतीद्वारे दिली.
या सर्व कार्यक्रमाकरिता कु. प्रियंका सहारे उपसरपंच, सुखमाताई जागधुर्वे माजी जि.प.सदस्य श्री स्वप्नील शिंपी ,लालाजी जांगधुर्वे, पुष्पा नरोटे ,सुलभा इंदुरकर ,ममता आचला ,देवराव नरोटे ,श्री अशोक पाडवते ,श्री धनगुन सर, श्री करणशहा काटेंगे, वसंत जांगधुर्वे ,रोशनी टेंभुर्णे ,संगीता जांगधुर्वे, कुंता कुमोटी ,विलास कोरेटी ,गणेश मडावी, नरेश उसेंडी ,संदीप अंबादे,कलीराम गावडे ,गजानन काटेंगे , देवराव उसेंडी,अमित शिंपी ,विनोद कोराम, रणदीप उंदीरवाडे ,कविता नरोटे, व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.








