✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देशव्यापी अधिवेशन ओडिसा राज्यातील कटक येथे दि. २६ डिसेंबर २०२५ ला आयोजित केले होते व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण केल्या होत्या परंतु आडिसाच्या भाजप शासनाने ऐनवेळी परवानगी नाकारली त्यामुळे करोडो रुपयाचा खर्च वाया गेला व संविधानाच्या कलम १४ , १९ आणि २१ चे उलंघन आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ देशभरात ७२५ जिल्हात दि. १९ जानेवारी २०२६ ला धरणे आंदोलन करण्यात आहे.
भारत मुक्ति मोर्चा बामसेफ व सहयोगी आरपिआय च्या वितेने इंदिरा गांधी चौकात दि. १९ जानेवारीला बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , भारत मुक्ती मोच्याचे संयोजक प्रमोद राऊत वआरपिआय चे जिल्ह्याध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आले तर २८ जानेवारीला जिल्हा मुख्यालयावर रॉली प्रदर्शन व 22 फरवरी २०२६ ला देशभरातील लाखो लोक संविधानावरील हल्याचा निषेध करण्यासाठी नागपूर येथीलआरएस एस मुख्यालयावर महारॉली आयोजित करण्यात आली आहे.
धरणे आंदोलनात प्रमोद बांबोळे , डोमाजी गेडाम , तुळसिराम सहारे ‘यादव सेमस्कार ‘ रोशन उके ‘ नामदेव दुधे ‘ लवकुंश भैसारे , मोरेश्वर निमगडे , नरेंद्र शेंन्डे , श्रीरंग उंदिरवाडे , डॉ. उज्वला शेंन्डे , निशा बोदेले विभा खेवले , राहुल घोनमोडे टिएम पाझारे , नरेंद्र शेन्डे , घनश्याम रामटेके , चोखोबा ढवळे , केशव गणविर , प्रेमदास रामटेके , रमेश गजभिये , शिध्यार्थ भानारकर मुरलीधर मेश्राम ,वृशाली उंदिरवाडे , सुनंदा बांबोळकर , करिना गणविर ज्योती मेश्राम . प्रनिता सहारे , अमिता भैसारे ,प्रेमलता कान्हेकर , रोजा घागरगुंडे आदि सहीत बामसेफ व आरपिआय चे .बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









