भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध….
✍️प्रवीण रोगे
वणी
वणी:-भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध असल्याने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे वणी येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १२.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ देशव्यापी संप व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी संघटना,प्रहार जनशक्ती पक्ष,आयटक कामगार संघटना यांच्या वतीने प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात अमेरिके सोबत शेतकरी विरोधी झालेल्या करारासाठी आणि चार लेबर कोड रद्द करण्यासाठी, शेती क्षेत्राची अमेरिके समोर शरणागती,पियुष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी, मल्टीनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाचा धोका थांबविण्या करीता १२ फेब्रुवारी रोजी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यामुळे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सतिश देरकर, कॉम्रेड अनिल घाटे, अनिल हेपट,देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील बोबडे, रघुवीर कारेकर, यांनी पत्रकार परिषदेत केले.








