संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-त्रिभुवन तुकाराम बाळबुध्दे अंगारा हे जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर दि. २४ डिसेंबर २०२५ पासुन अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत त्यांनी मंध्यतरी पाणी त्यागसुद्धा केलेले आहे. 22 दिवश लोटूनही जिल्हाधिकारी पंडा साहेबांनी बाळबुध्दे च्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बाळबुध्दे अंगारा यांची वडीलोपार्जीत शेती आहे ७/१२ मधे बाळबुध्देचे नाव आहे शेतीचे हिस्सेवाटे झाल्यानंतर नविन ७/१२ देण्यात आला तो बाळबुध्दे ला मान्य नाही यात तलाटी अंगारा यांनी डु प्लीकेट सही करून नविन ७ /१२ करतांना काही वारसांनाचे नावे कापली व मला नापिक जमीन दिली ते मला मान्य नाही , जुन्या ७/१२ नुसार माझ्या हिस्साची सुपीक जमीन बाळबुध्दे यांना देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार कुरखेडा व तलाटी अंगारा यांना देऊन पुन्हा मोजणीचे आदेश घ्यावे व मला न्याय मिळवुन घ्यावा या मागणीसाठी त्रिभुवन बाळबुध्दे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. बाळबुध्दे यांच्या उपोषणाला आरपिआय चे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , प्रमोद राऊत , डोमाजी गेडाम , हेमंत बारसागडे आदिंनी भेट देऊन पाठींबा दिला आहे तर या संबंधाने निवासी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सुद्धा दिलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारांचा वापर करून योग्य तो तोडगा काढवा अशी मागणी बामसेफ व आरपिआय ने केलेली आहे.








