संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गोंडपिपरी आष्टी मार्गावरील तारसा गावाजवळ ट्रक व दुचाकिची समोरासमोर धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी .
दिनांक १७ जानेवारी २०२६ ला रात्रौ १२ चे दरम्यान गोंडपिपरी आष्टी मार्गावरील तारसा गावाजवळ ट्रक व दुचाकीची आमने सामने धडक दिल्याने या अपघातात पिंटू उर्फ आर्यन प्रेमदास गोंगले वय १९ रा. विठ्ठलवाडा या दुचाकी स्वार युवकांचा जागीच मृत्यु झाला तर शेरू उर्फ श्रेयस डोर्लीकर गंभीर जखमी झाला याला नागपूर येथील दवाखाण्यात नेण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार MH 33 AH 9869 क्रंमाकाच्या दुचाकीने ते दोघे मित्र गोंडपिपरी येथुन विठ्ठलवाडा गावाकडे जात होते. समोरून TS 17 T 3132 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली असता या भिषण अपघातात आर्यन गोंगले याचा जागीच मृत्यु झाला तर श्रेयस डोरलीकर गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत्यूदेह ताब्यात घेऊन जखमी युवकाला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. सदर घटनेमुळे विठ्ठलवाडा गावात शोककळा पसरली होती.








