✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयातील जि.प व प.स चा आगामी निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार असल्याची माहीती बसपा कार्यालय गडचिरोली येथील पार पडलेल्या बसपाच्या बैठकीत पुर्व विदर्भ संयोजक प्रभारी गडचिरोली यांच्या अध्यक्षेखाली तर पुर्व विदर्भ संयोजक वामनदादा सोमकुवर तर गडचिरोली जिल्हा बसपा अध्यक्ष भाष्करभाऊ मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यात बसपा पक्ष प्रमुख बहनजी मायावती यांच्या आदेशान्वये सदर निर्णय घेण्यात आल्याची माहीती मुरलीधर मेश्राम यांनी दिली.
सदर बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सोमाजी धारणे , जिल्हा प्रभारी जोगेश्वर माने जिल्हा महासचिव सुधिरभाऊ वालदे माजी जिल्हा अध्यक्ष वामनराव राऊत , राजेश लिंगायत ,हरेंद्र मेश्राम , योगराज बांबोळे , शिध्दार्थ घुटके ज्ञानोदय वालदे , महिला जिल्हाध्यक्ष मायाताई मोहुर्ले , शहराध्यक्ष वेणुताई खाब्रागडे सुमनताई कऱ्हाडे आदि सहीत बहुसंख बसपा कार्यकर्त उपस्थित होते.
गडचिरोली नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन पॅनल मधे बसपा होती परंतु न .प निवडणुकीत फार वाईट अनुभव आल्यामुळे आता जि .प व प. स . निवडणुकीत बसपा स्वबळावर लढवेल अशी माहीती बसपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष भाष्कर मेश्राम यांनी दिली.








