संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-तेलंगणा राज्याच्या निर्मीती होताना प्रत्यक्ष साक्षीदार व तेलंगणा राज्य निर्मीतीसाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर अण्णा सेनिगरपु सिरोंचा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष समय्या पोचम पसुला व इतर कार्यकर्तानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर महत्वपूर्ण बैठकीला माजी आमदार ॲड. वामनराव चटप माजी मंत्री डॉ. रमेश गजबे सामाजिक कार्यकर्ते शंकर अण्णा सेनिगरपू माजी जि.प अध्यक्ष समय्या पसुला ॲड. विनय बांबोळे ॲड. वसंत चिळंगे , इजि. नितिन मोहीते ,अशोक पोरड्डीवार ‘श्रृषी शेंबे यांचेसह आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
विदर्भ राज्य आंदोलनाचा इतिहास शंभर वर्ष जुना आहे. अनेकांनी संघर्ष केले आज आम्हीही करीत आहोत परंतु आमच्या मागणीकडे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन दर्लक्ष करीत आहे त्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे. त्यासाठी लढा तिव्र करण्याकरीता तेलंगणा राज्य निर्मितीच्या आंदोलनातुन धडे घेतले पाहिजे. विदर्भाचा प्रश्न हा केवळ भावनांचा नसुन राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा आणि समतोल विकासाला आहे यासाठी लोकशाही मार्गाने संघटित होवून लढा तिव्र करू या अश्या प्रकारचे मार्गदर्शन ॲड. वामनराव चटप यांनी केले.विदर्भाच्या विकासासाठी
स्वतंत्र राज्य हाच एकमेव मार्ग आहे अशा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.








