✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-मेळघाट जवळील एकताई या आदिवासी गावातील सर्व ‘कथित भूतबाधा’ झालेल्या सातही मुलींच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्या मुलींशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांच्या पालकांची महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते नंदिनी व रामभाऊ डोंगरे हे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं पण समुपदेशन केलं.
पालक आता मुलींना शाळेत पाठवायला तयार आहेत. मुली सुद्धा शाळेत यायला उत्सुक आहेत. त्याचबरोबर गावातील एका युवकांच्या ग्रुप सोबत सुद्धा चर्चा केली. ही सर्व मुले ग्रज्युएट झालेली आहेत आणि शासनाच्या विविध विभागात नोकरी करिता धडपड करीत आहेत.
नंदिनीने काही प्रयोग करून दाखवून त्यांच्या भूत या संकल्पनेविषयी त्यांना मार्गदर्शन केलं. प्रा.प्रवीण देशमुख सर यांनी त्यांच्या जवळील काही पुस्तके त्यांना प्रेझेंट दिलीत व
‘भूमका’ कडे न जाता डॉक्टरांकडे जाणं कसं योग्य आहे ते समजावून सांगितलं.
सर्व भेटी घेताना तीन गोष्टींवरच भर दिला
भूत नसतं ,
भूमका कडे जाऊन वेळ दवडू नका औषधोपचार घ्या ,
आणि कुठल्याही कारणास्तव शिक्षण सोडू नका.
अतिशय मैत्रीपूर्ण संवाद साधत त्या सर्व मुलींचे कौन्सिलिंग केले गेले.
पालकांनी सुद्धा कुठलाही विरोध, नाराजी न दर्शविता सगळे म्हणणं शांतपणे ऐकून घेतले.
आज सायंकाळी पुन्हा एकदा डोमा शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली व भेटीगाठींचा वृत्तांत त्यांच्या कानावरती घातला. तसेच पुढे काय करायला पाहिजे याविषयीच्या सूचना दिल्यात.















