गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर
नागपूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच महिला महासंघ, कर्मचारी-अधिकारी महासंघ, युवा महासंघ, किसान महासंघ, राष्ट्रिय ओबीसी मेडिकल सर्व्हिसेस महासंघ,वकील महासंघ आणि विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २६ आणि ऑगस्ट २०२६ नागपूर येथे धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.
या बैठकीत दिनाक १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेच्या प्रश्नावली मध्ये १० व्या प्रश्नात अनुसूचित जाती , जमाती आणि जात संबंधित प्रश्न विचारला आहे परंतु ओबीसींचा कॉलम नसल्याने, लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून त्यात २०२७ च्या जनगणनेच्या ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा, केंद्रात ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय असावे, क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, या मागण्या घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ बबनरावजी तायवाडे साहेब यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले
लढा अनेक वर्षांचा… संघर्ष अखंड सुरूच राहणार!
डॉ. बबनरावजी तायवाडे यांनी सांगितले आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि प्रेरणादायी आहे — ओबीसींच्या हक्कासाठीचा हा लढा आजचा नाही; हा अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आहे आणि ओबीसींना न्याय व त्यांचे हक्क मिळेपर्यंत हा लढा कायम लढविला जाईल.
परिस्थिती कोणतीही असो, आव्हाने कितीही मोठी असोत; ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांशी तडजोड केली जाणार नाही. संघटन, संघर्ष आणि सातत्याच्या बळावर हा लढा अधिक ताकदीने पुढे नेला जाईल.
लढा थांबणार नाही…
संघर्ष कमी होणार नाही…
ओबीसींच्या हक्कासाठी आवाज कायम बुलंद राहणार
“आजचा संघर्ष उद्याच्या पिढीच्या अधिकारासाठी आहे!”
महासचिव सचिनजी राजुरकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की “ही लढाई आता आर पार ची लढाई आहे!”
बैठकीत व्यक्त केलेला “ओबीसींच्या हक्कासाठी ही आर पार ची लढाई लढायची” हा निर्धार निश्चितच प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्याच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करणारा आहे.
आता मागे हटायचे नाही, थांबायचे नाही आणि झुकायचेही नाही. ओबीसींच्या हक्क, अधिकार आणि न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनाशी केला पाहिजे.
नेतृत्वाचा निर्धार ठाम आहे,
कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड आहे,
आणि ओबीसी समाजाची एकजूट हीच आपल्या विजयाची ताकद आहे! आर पार ची लढाई… निर्णायक लढाई… विजयाची लढाई! असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्ष रत्नमाला पिसे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर,शेखर सावरबांधे, डॉ अशोक जीवतोडे सुभाष घाटे, गुणेश्वर आरिकर , प्रा शरद वानखेडे, प्रा राजु गोसाई, प्रकाश साबळे, दिनेश चोखारे,दादाजी चुधरी सुरेश भांडेकर, रामकृष्ण ताजने तसेच राज्यभऱ्यातून ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सुरज बेलोकर तर आभार ऋतिका डाफ यांनी केले ओबीसी बांधव उपस्थित होते














