गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर RPI
गडचिरोल:-महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची सरसकट कर्जमुक्ती केली म्हणुन देवाभाऊचे अभिनंदन करण्याकरीता माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी पत्रकार घेऊन पत्रकार परिषदेत माहीती दिली.
सदर पत्रकार परिषदेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे माजी आमदार डॉ. देवराव होळी जेष्ठ नेते बाबुराव कोहळे प्रमोदजी पिपरे रमेशजी भुरसे आदिवासी नेते डॉ. नितिन कोडवते डॉ. चंदा कोडवते किसान मोर्च्याचे महामंत्री प्रकाशजी गेडाम किसान मोर्च्यांचे अध्यक्ष विलास भांडेकर भारत खटी गोवर्धन चव्हाण आदिची प्रमुख उपस्थिती होती.

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी पुढे सांगितले की , मुख्यमंत्री देवाभाऊचे कौतुक करण्यासारखे आहे. त्यांनी शेतकर्यांच्या हितासाठी दोन वेळा कर्जमुक्ती केली. शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती यातुन 3८ हजार कोटीची कर्जमुक्ती केली तर अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती ५६ लाख शेतकर्यांची कर्जमुक्ती केली. कर्जमुक्ती करतांना सर्व अटी दुर ठेवून सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त केले.
कांग्रेसच्या ५० वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षात करून दाखविले. कृषी क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना प्रत्येक बचत गटासाठी एक लाख रुपये कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा निर्णय घेतला. देशाला विकासाकडे कसे नेता येईल यांची काळजी पंतप्रधान घेत आहेत येत्या काळात विश्वामधे भारत १ ल्या क्रंमाकावर नक्कीच येइल अशा विश्वासही माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी व्यक्त केला. कालपरवा मुसळधार पावसामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी भाजपाकडून मुख्यंमत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे करण्यात येणार आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी सांगितले.













