✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-आरमोरी तालुक्यातील अवघ्या दोन कि.मी अंतरावर असलेल्या रामाळा ते वैरागड रोडवर २० ते २२ हत्तीचा कळप जंगलात रोडवरून जातांना रामाळा नागरिकांना आज दि. २२ जुलैच्या सकाळी ७ वाजता दिसाला त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले.
वनविभाग आरमोरीच्या कर्मचाऱ्यांना माहीती मिळताच आरमोरी वनविभागाच्या कर्मचार्यानी सुध्या हतीचा कळप प्रत्यक्ष पाहताच त्यांनी रामाळा ते वैरागड रस्ता काही काळापर्यत बंद ठेवला होता. गेल्या तिन दिवसापासुन वैरागड रामाळा ते जोगीसाखरा जंगलात हतीचा वावर सुरु आहे त्यामुळे शेतावर जाणारे शेतकरी शेतमजुर व प्रवासी यांना सर्तक राहण्याचा हशारा दिला असुन आरमोरी वनविभागाचे कर्मचारी हतीचा कळपावर सतत पाहरा ठेवत आहेत. संध्या हत्तीचा कळप रामाळा ते वैरागड जंगलात दिवसा मुक्कामाला आहेत परंतु सांयकाळी ७ ते रात्रौच्या दरम्यान सदर हत्तीचा कळप रस्त्यावर शेतात तर गावाकडेही आपला मोर्चा वळवू शकतात तेव्हा नागरिकांनी सर्तक राहण्याचा ईशारा वनविभाग आरमोरी चा कर्मचार्यांनी दिलेला आहे.













