✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
आरमोरी:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)च्या वतीने आरमोरी येथील रेस्ट हाऊस येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे


जिल्हाध्यक्ष प्रा. मुनीश्वर बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे जिल्हा उपाध्यक्ष, मारोती भैसारे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद अंबादे सोनु साखरे , टि. एम खोब्रागडे ,महासचिव अशोक शामकुळ, अँड. शुकदेवे सामजिक कार्यकर्ता चक्रधर मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे तालुकाध्यक्ष हरिदास सहारे आदीची
उपस्थिती होती.
बैठकीमध्ये आगामी काळातील पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी, पक्षाच्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, वंचित व दुर्बल घटकांचे प्रश्न, युवक व महिलांचे प्रश्न तसेच आरमोरी परिसरातील विविध स्थानिक समस्या यावर चर्चा करण्यात आली.
तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी RPIच्या माध्यमातून व्यापक आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीला नाजूक भैसारे, भूषण शामकुळे,तुकाराम खोब्रागडे, एकनाथ बोरकर,मुखरू मेश्राम,रुमाकांत कोल्हेकर, लालजी मेश्राम,देवानंद गेडाम, पुरंदर देशपांडे युवराज धंदरे सुरेश बोरकर बाळू सावकार ढेभुर्णे एकनाथ बोरकर मनोहर खोब्रागडे जिवन रामटेके दिलीप रामटेके सहीत RPIचे बहुसख्य कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













