संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान कार्यक्रम भन्ते विनाचार्य व भिक्खु संघ यांच्या मार्गदर्शना खाली गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ ला पाली बुद्धविहार पंटागण बल्लारपुर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमात दुपारी १ वाजता शहराच्या मुख्य मार्गातून रॉली काढण्यात येणार असुन त्यानंतर भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शन होणार आहे .तरी होवु घातलेल्या कार्यक्रमात बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजय चव्हाण , अशोक भावे , जयदास भगत विश्वास देशभ्रतार , आशिष तामगाडगे ॲड. रमण पुणेकर , ॲड. प्रियंका चव्हाण , गायत्री रामटेके , प्रकृती पाटिल , मंदा ढोके , विना उमरे, श्रावती खोब्रागडे आदिनी केलेले आहे.








