संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-माता रमाई बुद्धिझम परिणय ब्रम्हपुरी यांच्या विद्वमाने बौद्ध धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा रविवार दि. १५ फरवरी २०२६ सकाळी ११ वाजता राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी रोड , गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर , सामाजिक कार्यकर्ते भोजराज कान्हेकर , रत्नघोष नान्होरीकर चेतन इंटरप्राईजेस गडचिरोली आदिची उपस्थिती राहणार असुन मेळाव्यात उपवर वधु वरांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील मेळाव्यात अविवाहित विधूर विधवा घटस्फोटीत सर्वांकरीता खुले राहील.
सदर होणाऱ्या मेळाव्यास उपवर वधु वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बागडे ,घनश्याम रामटेके धर्मप्रकाश शेंन्डे , विवेक मेश्राम पंढरीनाथ आडे , मारोती भैसारे दशरथ साखरे , प्रमोद राऊत चोखोबा ढवळे ,संघमित्रा राजवाडे लता रामटेकेआदिनी केलेले आहे.💢 संपर्कासाठी प्रा. मुनिश्वर बोरकर मो. न. 942 l 734792.💢








