गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-भव्य दिव्य अशा धम्म परिषद वर्धा येथे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत गोल्डन मॅन रोहित पिसाळ सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर व इतर मान्यवरांच्या हस्ते, सन्मान चिन्ह पंचशील शाल व पुष्पगुच्छ देऊन समाजसेविका शुशीला भगत यांचा समाज भुषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
मंचकावर उपस्थितीत टी वाय एस पी वर्धा मंकेश्वर साहेब शिक्षक संस्था हिंगणघाट येथील जवादे सर. भंन्ते सत्यानंद थेरो येणाडा यांचा पूजन्यनिया भंतेजी संघ. भन्तेजी आनंद थेरो दिल्ली. व इतर मान्यवरांच्या साक्षीने हा समाज भूषण पुरस्कार मिळाला या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पंधरा ते वीस हजार फुले शाहू आंबेडकरी जनसमुदाय प्रामुख्याने हजर होता. या भव्य दिव्य धम्म परिषदेचे आयोजन भंते राजरत्न थेरो यांनी केले.⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬








