संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोर्ला गावातील वैनगंगा नदिघाटावरून रात्रौ अवैध रेतीचे उत्खनन होतांना दिसतो. रात्रौ दररोज दोन चार ट्रॉक्टरी अवैध रेती आणतांना दिसतात.
पोर्ला वैनगंगा नदिघाट रेती शासनाने ठरवून दिलेले आहे. सदर रेती ही या परिसरातील घरकुल बांधकामाकरीता घाट दिलेला असुन पोर्ला तलाट्याने देखरेख करून सांभाळायचा आहे. असे असतांना रात्रौ व पहाटेच्या सुमारास वैनगंगा नदिघाटावरून रेती भरलेले ट्राक्टर येतात कसे. शासनाने घाट दिलेला आहे तेव्हा दिवशा टिपी फाडून रेती दुलाई करायला पाहीजे परंतु तसे न होता रात्रौ – पहाटेला घाटावरून ट्राक्टरी येतात हे अवैध रेती प्रकरण असतांना सुद्धा व RI गडचिरोली व तलाटी पोर्ला यांचे रात्रौ गस्त असतांना अवैध रेती चोरी होतेच कशी आज दि. २० जानेवारी २०२६ पहाटेला दोन ट्राक्टरी नदिपात्रात होत्या आज तरी RI व तहसिलदारांनी ट्राक्टरी जप्त केल्या कि चिरीमीरी घेऊन सोडून दिल्या याकडे जिल्हाधिकाऱ्या लक्ष पुरवावे व संबंधितावर कारवाई करावी.







